जेजुरी प्रेस 25.12.2017
वने व वन्यजीवांचे रक्षण करणे काळाची गरज: जयश्री जाधव
जेजुरी प्रतिनिधी: पाळीव प्राण्यांच्या रक्षणासाठी वाघांची होणारी हत्या गंभीर विषय असून त्यासाठी लोकांमध्य जागृती करून वने व वन्यजीवांचे रक्षण करणे काळाची गरज आहे आणि जक्या अनेक वर्षांपासून टीसीआरसी सह्याद्रीचा व्याघ्र प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच वने व वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनाचे कार्य सातत्याने करीत असल्याचे गौरवोद्गार पुरंदर विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी जयश्री जाधव यांनी काढले.
वाघांचे संवर्धन व रक्षण व्हावे, यासाठी टायगर काँझर्वेशन अँड रिसर्च सेंटर मुंबई या संस्थेच्यावतीने सह्याद्रीचा वाघ वाचवा अभियानांतर्गत मुंबई ते सांगली मोटार सायकल रॅलीला मार्गस्थ करतांना त्या बोलत होत्या. 22 डिसेंबर राजी मुंबई-ठानेपासून सुरू झालेली ही रॅली आज मुरबाड, मंचर मार्गे जेजुरी येथे पोहचली.
जयश्री जाधव म्हणाल्या की, वाघ ज्या जंगलात असतो, ते जंगल खऱ्या अर्थाने परिपूर्ण समजले जाते . त्यामुळे आपण जंगलतोड थांबवली पाहिजे आणि वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न केले पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या हरित सेनेचे सभासद होऊन वृषारोपन मोहीमेत सहभागी व्हावे. अंडड्रॉइड मोबाईल वरील ग्रीन आर्मी या अँपशी सर्वांनी संलग्न व्हावे.
यावेळी टीसीआरसीचे अध्यक्ष प्रसाद हिरे म्हणाले की, जेजुरी नगरी ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडेरायांची पावन नगरी आहे. सह्याद्री खोऱ्यातील सुंदर निसर्ग रम्यता जपून वनसंपदेसह वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन झाले पाहिजे.
टीसीआरसीच्या "सह्याद्रीचा वाघ वाचवा" मोहिमेतील मालेगावच्या तरुणांच्या पथनाट्याला बस स्थानक, जिजामाता हायस्कुल, उघड्या मारुती चौक येथे लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. यावेळी वन परिमंडळ अधिकारी व्ही. आर. वेलकर, नियत वन अधिकारी बी. व्ही. गोलांडे, जिजामाता हायस्कूल चे उबाळे सर आदी उपस्थित होते. रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रॅली फलटणच्या दिशेने रवाना झाली.